fbpx

‘भगव्या रंगावर कुणाची मक्तेदारी नाही, मग आम्ही वापरला त्यात गैर काय’

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आता इथून पुढे दोन झेंडे वापरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इथून पुढच्या सर्व कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्या बरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा असेल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

यावरून सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी सोलापूरमध्ये संवाद दौऱ्यात बोलताना ‘भगव्या रंगावर कोणाची मक्तेदारी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आहे. त्यामुळे आम्ही भगवा झेंडा वापरला तर गैर काय?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच पक्षांतरावर बोलताना त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. पक्ष सोडून जाताना नेत्यांनी पक्षावर आणि शरद पवारांवर टीका केली नाही. पक्ष सोडून गेलेल्यांचा पराभव झाला आहे असं विधान  केले आहे.

दरम्यान, विनोद तावडे यांनी भगव्या झेंड्यावरून अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी भगवा झेंडा हा आपल्या परंपरेचं प्रतिक आहे. मंदिरात भगवा झेंडा असतो. वारीला जातो त्या वारकऱ्याकडे भगवा झेंडा असतो. भगवा झेंडा हा मुळात त्यागाचं प्रतिक आहे. आपले सगळे गुरु, महाराज हे सगळे भगवे असतात, कारण ते त्यागाचं प्रतिक आहे. त्यागाचे प्रतिक घेऊन जे राज्य करतात ते त्याग करतात. त्यामुळे स्वार्थ करणारे ज्यांच्यावर राज्य सरकारी बँकेतील घोटाळ्यामुळे गुन्हे दाखल करा म्हटले आहे, त्यांना भगव्या झेंड्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही अशी टका केली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्यात त्या सहा जिल्ह्यात जाणार आहेत. या दौऱ्यात राज्यातील पूर परिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढिसाळ कारभार याचा आढावा घेणार आहेत. संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे संवाद दौरा करणार आहेत.