यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य…

yashomati thakur - supriya sule

पुणे : आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. एका कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी महाविकास आघाडी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली.

अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यामधील पारसफाटा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात यशोमती ठाकूर बोलत होत्या. यावेळी ठाकूर म्हणाल्या की, बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. ४५० रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी एक हजार १२५ रुपये केलेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की कमीतकमी दोन हजार ५०० रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. तसेच पुढे बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत.

यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागणी केलीय, ते त्यावर विचार करतील, ताईंनी आणि उपमुख्यमंत्री यांनी अनाथ मुलांना निधी दिला आहे, मात्र तरी याबाबत कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल’. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत, त्या पुण्यात बोलत होत्या.

महत्वाच्या बातम्या