‘जगात काहीही अशक्य नसतं असा संदेश तुझ्या खेळीतून मिळतो…’

dhoni pawar

मुंबई : एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली. धोनीने आपल्या संपूर्ण प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की संध्याकाळी 7.29 पासून त्याला निवृत्त समजले पाहिजे. शुक्रवारी धोनी आयपीएल चेन्नईला पोहोचला आणि शनिवारी तो जिममध्येही दिसला होता.

39 वर्षीय एम.एस धोनीने कसोटी क्रिकेट मधून यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी -२० सामन्यात तो भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्वाचा भाग होता. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधारही होता. तसेच धोनीच्या नावाच्या बऱ्याच मोठ्या विक्रमांच्या नोंदी आहेत.

‘भारतीय क्रिकेटला विश्वविजेता बनविणारा कर्णधार म्हणून तुझं योगदान ग्रेट आहेच पण त्याहीपेक्षा जगात काहीही अशक्य नसतं असा संदेश तुझ्या खेळीतून मिळतो. क्रिकेटच्या विश्वातच नव्हे तर लाखो भारतीयांच्या हृदयात तु अढळपद मिळविले आहेस.तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा’ अस ट्विट करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धोनीच्या निवृत्तीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, महेंद्रसिंह धोनीपाठोपाठ आता त्याचा सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे, असं म्हणत, निवृत्ती जाहीर केली. धोनी आणि रैना यांनी एकाच दिवशी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने, क्रिकेटचाहत्यांसाठी हा अचानक बसलेला धक्का आहे.

ये दोस्ती हम नही छोडेंगे… धोनी पाठोपाठ सुरेश रैनाने देखील केली निवृत्तीची घोषणा

सुरेश रैनाने 18 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 768 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक 7 अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने वन डे आणि टी 20 सामन्यांमध्ये चांगलीच चमक दाखवली होती. रैनाने 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 615 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं, 36 अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने 78 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 1 हजार 604 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

तू मारलेला प्रत्येक यादगार फटका, किपिंग करताना उडवलेल्या दांड्या सदैव आठवणीत राहील