माझ्याविरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवा; सुप्रिया सुळेंंच सरकारला आव्हान

टीम महाराष्ट्र देशा:- देशात आणि राज्यात ईडी आणि सीबीआय चौकशीवरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्याविरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवा, असं सरकारला आव्हान दिले आहे.सुप्रिया सुळे संवाद ताईंशी या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर आज त्या होत्या . यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी सोलापूर येथे संवाद साधला.

सुप्रिया सुळे बोलताना पुढे म्हणाल्या, मी काही केलंच नाही तर कुठून ईडी आणि सीबीआयची नोटीस पाठवणार, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला केला आहे. थोडे दिवस ईडी-सीबीआयवाले ताणतील, मात्र शेवटी मीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला . जरी त्रास झाला तरी पर्वा नाही संघर्ष करायला मजा येते.आधी आमची सत्ता होती. एसी होता. सगळं काही गोल-गोल होतं. मात्र आता आमची सत्ता नाही. आता आम्हाला रस्त्यावर येऊन संघर्ष करायला मजा येत आहे, असंही त्या म्हणाल्या.

Loading...

एखादी मोबाईल कंपनी चांगली ऑफर देते त्यावरुन ग्राहक मोबाईल बदलतात, त्याचप्रमाणे ऑफर मिळाली की राजकीय नेते विचारधारा वगैरे न पाहता पक्षांतर करतात, याची खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली. सीबीआय, ईडी, बँका आणि साखर कारखाने या चार मुख्य कारणांमुळेच नेते पक्षांतर करत असल्याचं त्या म्हणाल्या. आतापर्यंत पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही नेत्याने पक्षाविरुद्ध बोललं नसल्याचं समाधानही  त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरु असतानच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले