भाजपने बारामतीतून लढावं, सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले मुख्यमंत्र्यांचे आव्हान

पुणे – लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. भाजप नेते आपल्या पक्ष वाढीसाठी बारामतीतुन उमेदवार देण्याचं बोलत असतील, त्यांनी बारामतीतून लढावं. जनता योग्य तो निर्णय करेल, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच आव्हान स्वीकारले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील शालेय विद्यार्थिनींसाठी आयोजित सायकल वाटपाचा कार्यक्रमातनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

काल पुण्यामध्ये भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह या तिघांनीही बारामती लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानंतर आता पवारांच्या गडामध्ये जाऊन भाजप त्यांना आव्हन देणार असल्याचे बोलले जात आहे.

Loading...

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानवर विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येक पक्ष आपल्या वाढीसाठी प्रयत्न करत असतो. आम्ही ज्या मतदारसंघात जातो जिथे आमचा खासदार नसेल तर आमचा खासदार निवडून यावा अशी आशा असते. लोकाशाहीमध्ये सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे. भाजपने बारामतीतून लढावं. जनता योग्य तो निर्णय करेल.

अमोल पालेकर यांना बोलू न देणे हे योग्य नाही. सध्या जो बोलतो त्याचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे, मी पालेकर यांच्या मागे ठामपणे उभी असल्याचं ही यावेळी सुळे म्हणाल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा