सुप्रिया पिळगावकर सविता बजाज यांच्या मदतीसाठी आल्या धावून

सुप्रिया पिळगावकर

मुंबई : कोरोना काळात सगळ्यांचीच कामं बंद पाडल्यामुळे अनेक बॉलीवूड अभिनेत्री तसेच अभिनेते अनेकांना कोणत्या न कोणत्या कारणामुळे आर्थिक मदत मागावी लागली. अशातच बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री त्यांच्या अभिनयाचा आणि सुंदरतेचा मोठा चाहता वर्ग होता. मात्र सविता बजाज यांच्यावर सध्या आर्थिक संकट ओढवले. सध्या त्या आजारपणामुळे चिंतेत आहेत. उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सविता यांना मागील काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘माझी स्थिती फार खराब आहे. माझ्याकडे कोणीही नाही. मी खूप पैसे कमावले होते पण सगळे उपचारांसाठी खर्च झाले. बँकेत केवळ ३५ हजार रुपये होते ते देखील काढले आहेत. गळा दाबून मला मारून टाका , मला असं जीवन नाही जगायचं. यापेक्षा तर मेलेलं बरं. या जगात माझं कोणी नाही, जो माझी काळजी घेईल,’ अस म्हणत त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले होत.

याच पार्श्वभूमीवर आता अभिनेते सचिन पिळगावकर यांनी भाष्य केलं होत. प्रसिद्ध वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, तुम्हाला तुमची सेव्हींग ठेवलीच पाहिजे. कधीही काहीही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की, आपल्या करिअरचा काहीच भरोसा नाही. असंही यावेळी सचिननं म्हंटल आहे.

तर दुसरीकडे सचिन पिळगांवकर यांची पत्नी आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनीच पुढाकार घेत सविता बजाज यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. सिंन्टाच्या मदतीने सुप्रिया पिळगांवकर यांनी सविता बजाज यांच्या उपचारादम्यानचा सगळा खर्च देत मदत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP