सुप्रिया शिष्य नसून मुलगीच बरी : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : आज गुरुपौर्णिमा आहे. गुरु आणि शिष्यातील नात्याचा हा सण आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली यात पवार यांनी सुप्रिया ही माझी शिष्य नसून मुलगीच बरी असल्याचे विधान केले आहे.

या मुलाखतीदरम्यान सुप्रिया तुमच्या शिष्य का असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार यांनी ‘सुप्रिया शिष्य नसून मुलगीच बरी. ती काही मला शिष्य वाटत नाही आणि मी देखील तिचा गुरू नाही. आमच्यात चर्चा होत असते. अनेकदा मतभेद होतात, परंतु, विश्लेषण करून सांगितल्यानंतर ती मान्य करते. आता आम्ही अशा स्थितीत पोहोचलो ज्यामध्ये आम्ही एकमेकांचे सहकारी आहोत अशा आशयाचं विधान केले.

दरम्यान, शरद पवार हे राज्यासह देशाच्या राजकारणातील महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या राजकीय शैलीचे खूप सारे चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपण शरद पवारांचे बोट धरूनचं राजकारणात आलो आहेअस विधान केले होते. त्यामुळे अनेक नेत्यांसाठी गुरुसमान आहेत.