मुबंईतील बलात्कार पीडित बालिकेच्या गर्भपाताची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

court १

नवी दिल्ली : मुंबईतील १३ वर्षीय बलात्कार पीडितेच्या गर्भपाताबाबतची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली आजची सुनावणी उद्या होणार आहे. २ सप्टेंबर रोजी या पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती आता उद्या देण्यात येणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे

महाराष्ट्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, पीडित मुलीचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे न्यायालयाने याबाबतची सुनावणी मंगळवारी करण्याचे ठरवले. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, मुबंईतील पूरपरिस्थितीमुळे या पीडितेची वैद्यकीय चाचणी ठरल्या दिवशी होऊ शकली नाही. २ सप्टेंबर रोजी या पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली. त्यामुळे वैद्यकीय अहवाल येण्यास विलंब झाल्याचे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले . सर्वोच्च न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळास गर्भपातासंबंधी चाचणी करून ५ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या पीडितेने गर्भपाताच्या परवानगीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.