fbpx

समाजातील ज्वलंत प्रश्नावर विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करा

टीम महाराष्ट्र देशा- ग्रामीण भागातील युवा वर्गात वक्तृत्व शैली आणि धाडस निर्माण व्हावे म्हणून बऱ्याच सामाजिक संस्था,राजकारणी आणि इतर समाज पुढाकार घेत असतात.परंतु खाकी वर्दीने अशा प्रकारचा पुढाकार घेतलेला कधी आपण एकालाही नसेल याला अपवाद पुण्यातील ग्रामीण पोलिसांचा आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नावर विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करणे आणि त्यावर उपाययोजना करायला पाहिजे असे मत  दौंड विभाग पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांनी व्यक्त केले.

शिरूर पोलीस स्टेशन,रांजणगाव पोलीस स्टेशन आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच दौंड उपविभाग यांच्या वतीने ‘डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप’ आयोजित केली होती.न्याय जलद व्हावा,छेडछाड,तरुणांचा राजकीय सहभाग, बालक व स्त्रियांवरील होणारे अत्याचार असे अनेक विषय या पार्लमेंट विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात आले होते.शिरूरच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात ही पार्लमेंट पार पडली.यामध्ये दौंड,यवत,शिरूर,शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती या ५ठिकाणच्या शाळा व महाविद्यालयाने सहभाग घेतला होता.या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय तर छोट्या गटात आर एम धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कुल,शिरूर यांचा आला.

यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक राजेंद्र कुंटे,तहसीलदार रणजित भोसले,रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक अमर वाघमोडे आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधीक्षक रमेश गलांडे आदी उपस्थित होते.