ब्रेकिंग : आधार कार्ड हे सुरक्षितच – सर्वोच्च न्यायालय

aadhar karj mafi online adhaar
टीम महाराष्ट्र देशा : आधार कार्डच्या वैधतेबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या 27 याचिकांवर जवळपास चार महिने न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. मात्र हा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज न्यायालयाकडून सुनावण्यात येणार असल्याने साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. अखेर आधार कार्ड हे सुरक्षित असून त्याला डुप्लिकेटचा धोका नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पण या खटल्यावर वाचन सुरू आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं केंद्र सरकार आणि याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला. 17 जानेवारी पासून 38 दिवस हा युक्तिवाद सुरू होता. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. आधार कार्डमुळे नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग होतो का, हे आहे आज स्पष्ट होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे आधारसंदर्भातील सर्व संभ्रम दूर झाले आहेत.Loading…


Loading…

Loading...