न्यायालयातील कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याची सुरूवात सुप्रीम कोर्टातूनच होणार असून यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.

घटनात्मक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान थेट प्रसारण झाले पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय दिला. जनतेचे अधिकार आणि याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होणार नाही, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केले जातील, असे कोर्टाने निर्णय देताना सांगितले.

You might also like
Comments
Loading...