नवी दिल्ली: ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. त्यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
27 डिसेंबर 1988 साली नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधू यांचा पटियाला येथे कार पार्किंगवरून गुरनाम सिंग नावाच्या वृद्धाशी वाद झाला होता. यामध्ये गुरनामचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्याविरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब सरकार आणि पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर 1999 मध्ये सत्र न्यायालयाकडून नवज्योत सिंग सिद्धू यांना दिलासा मिळाला आणि खटला फेटाळण्यात आला. आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि अशा प्रकरणात केवळ संशयाच्या आधारे खटला सुरू करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र 2002 मध्ये राज्य सरकारने सिद्धू यांच्याविरुद्ध पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात अपील केले होते. या प्रकरणीच न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलारांच्या टीकेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक
- IPL 2022 RCB vs GT : बंगळूरूसाठी गुजरातचा ‘कठीण’ पेपर; पास झाले तर ठीक नाहीतर…!
- दाढी-मिशावर केलेल्या विनोदामुळे भारती सिंगवर गुन्हा दाखल
- बापरे…! श्रीलंकन फलंदाजाने बांगलादेशच्या यष्टीरक्षकाच्या डोक्यात मारली बॅट; पुढे काय झाले? पाहा VIDEO!