राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका

टीम महाराष्ट्र देशा : राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा दणका दिला आहे. राफेल गैरव्यवहार प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. राफेलचा मुद्दा लोकसभेत चांगलाच गाजला होता. विरोधकांनी या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले होते.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपला निवडणुकीच्या तोंडावर फटका बसला आहे. यामुळे मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.