भारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले ‘भारत एके दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल’ अश्या शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली.

स्वच्छ भारत मोहिमेच्या गप्पा मारणाऱ्या मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू न केल्याने चांगलेच फटकारले. ‘आम्ही आदेश देतो पण घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले जात नाही. मग आदेश देण्याचा फायदा काय? आदेश लागू करण्याबाबत कुणीही फारसं गंभीर नाही.

त्यामुळे भारत एके दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल.’ असे, न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी तीन महिन्यात एक नीति तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

You might also like
Comments
Loading...