सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळली

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असू पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

उच्च न्यायालाने याचिका फेटाळताच याचिकेतील मुद्दे विचारात घेतले नसून केवळ सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश ग्राह्य़ धरला. त्यामुळे ही याचिका विचारात घेऊन अध्यादेश रद्द करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवेश खोळंबला होता. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलने करत आरक्षणाची मागणी लावून धरली होती. यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढत मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोकळा करून दिला होता. मात्र खुल्या प्रवर्गातील इतर नाराज घटकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.

Loading...

दरम्यान  मराठा आरक्षण लागू होण्याआधीच राज्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती आणि कायदा नंतर लागू झाला होता. त्यामुळे यावर्षी प्रवेश होऊ नये, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या निर्णयाची चालू वर्षापासून अंमलबजावणी करण्यास नकार देत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली होती. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले होते. यानंतर, सरकारने अध्यादेश काढत आरक्षणाचा मार्ग मोकळा केला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात