fbpx

‘श्रीदेवी’ यांच्या मृत्यूच्या चौकशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली – अभिनेत्री ‘श्रीदेवी’ या आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्याचं दुबईमध्ये २४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले होते. या प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतरही त्यांच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त करण्यात येत होता.

दरम्यान चित्रपट निर्माता सुनिल सिंह यांनी अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशीची करण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या स्वतंत्र चौकशीची मागणी फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करुन घेतली असल्याने सर्वांचं याकडे लक्ष लागलं होतं.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. दुबईत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचं निधन झालं होतं, ज्यानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू बुडून झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. श्रीदेवी यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे.