आसाराम बापूला दणका, जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

blank

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला मोठा दणका दिला आहे. सूरत बलात्कार प्रकरणी जामीन देण्याची आसाराम बापुची याचिका पुन्हा एकदा फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे त्याला आता तुरुंगातून बाहेर येत येणार नाही.

सूरत बलात्कार प्रकरणी आसाराम बापू सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याने जमीन मिळावा म्हणून न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. परंतु ती आता फेटाळण्यात आली आहे. तसेच अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यावर पुढील निर्णय घेऊ असंही त्याला सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आसाराम बापूविरोधात सुरु असणाऱ्या खटल्य़ामध्ये अद्यापही १० साक्षीदारांची साक्ष घेतली नसल्याचं गुजरात सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील निर्णायक सुनावणी काय असणाऱ याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.