‘३१ जानेवारी पर्यंत देशातील अंगणवाड्या सुरु करा’ सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: कोरोनामुळे शाळा आणि अंगणवाड्या गेल्या जवळजवळ वर्षभरापासून बंद आहेत. मात्र यामुळे मुलाचं शैक्षणिक नुकसान होतच आहे त्याचबरोबर अंगणवाड्यां बंद असल्याने मुल आणि स्तनदा मातांच्या आहार आणि आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. या साठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी देताना न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आदेश जरी केले आहेत की, अंगणवाड्या बंद झाल्याने मुल आणि स्तनदा मातांच्या आहार आणि आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत देशातील अंगणवाड्या उघडण्यात याव्यात.

यावेळी खंडपीठाने महिला आणि बाल विकास मंत्रालयाला विशेष आदेश जरी केले की, खाद्य सुरक्षा आणि मानक अधिनियम की अनुसूची 2 नुसार मुले आणि स्तनदा मातांना आहार मिळणे गरजेचे आहे. अद्याप देखील देशातील अंगणवाड्या उघडल्या नसून ज्या अंगणवाड्या कंटेनमेंट झोन च्या बाहेर त्या अंगणवाड्या उघडण्यात याव्यात.

महत्वाच्या बातम्या