fbpx

अयोध्या प्रकरण : मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

RamMandir

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांच्या नियुक्तीची घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. न्यायमूर्ती खलीफुल्लाह, श्री श्री रविशंकर आणि श्रीराम पंचू यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलाय. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या विशेष घटनापीठानं हा निर्णय दिलाय.

कोर्टाने आठवडाभरात मध्यस्थांची प्रक्रिया सुरु करण्यास बजावलं आहे. आठ आठवड्यात मध्यस्थींचा अहवाल येईल. न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थांसमोरील सुनावणी गुप्त पद्धतीने (ऑन कॅमेरा) चालेल आणि ही सुनवाणी फैजियाबाद येथे होईल.महत्त्वाचं म्हणजे मध्यस्थांच्या चर्चेचं वार्तांकन करण्यास मीडियाला मनाई करण्यात आली आहे.