fbpx

कर’नाटका’त कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षाच्या नाट्यामध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना जोरदार धक्का बसणार असल्याचे दिसत आहे. बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागेल.

कर्नाटकात जेडीएस – कॉंग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून दररोज नवीन नाट्य पहायला मिळत आहे, आता १५ आमदारांनी बंडखोरी करत आपले राजीनामे दिले आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी राजीनामे दिल्याने कुमारस्वामी सरकार धोक्यात आले आहे. आता सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना राजीनाम्यावर निर्णय घेण्याचे आदेश कोर्टाने दिल्यान जेडीएसच्या अडचणी वाढणार आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बंडखोर आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या याचिकांवरील सुनावणी मंगळवारी पूर्ण केली होती. दरम्यान, आता कुमारस्वामी यांना उद्या बहुमतसिद्ध करण्याची
अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.