देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी हेतूपुरस्पर दडविली. त्यामुळे उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आला. यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. त्यावर फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे.

You might also like
Comments
Loading...