मुंबई : शिवसेना बंडखोर आमदार आणि राज्य सरकार थेट कोर्टात पोहोचले आहे. सेनेच्या १६ आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी शिवसेनेने उपाध्यक्षांकडे केली होती. या सर्व वादावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली आहे. बंड आमदारांच्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू, शिवसेना गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठविली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नरहरी झिरवळ यांच्यासह प्रतोद सुनिल प्रभू, अजय चौधरी यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठविली आहे. या याचीकेची सुनावली ११ जुलै रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत अनेक मुद्दे शिंदे गटाचे वकील तसेच सरकारचे वकील यांनी समोर ठेवले. तर कोर्टानेही काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत या बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी ५ दिवसांचा अवधी वाढवून दिला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील 5 मोठे मुददे
१) बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई १२ जुलैपर्यंत टळली
२) उपाध्यक्षांच्या सूचनेला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारांना 12 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
३) नरहरी झिरवाळ, सुनील प्रभू आणि अजय चौधरी, तसंच केंद्राला सुप्रीम कोर्टाची नोटीस, म्हणणं मांडण्याचे आदेश.
४) बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षणं करावे.
५) पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
६) तसेच ११ जुलैपर्यंत बहुमत चाचणी घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी .
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<