मुंबई: शिवसेना बंडखोर आमदार आणि राज्य सरकार थेट कोर्टात पोहोचले आहे. सेनेच्या १६ आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी शिवसेनेने उपाध्यक्षांकडे केली होती. या सर्व वादावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली आहे. यात सुप्रीम कोर्टाने बंड आमदारांप्रकरणी केंद्रालाही नोटीस पाठवली आहे.
महाराष्ट्रातील बंडप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून केंद्राने शिंदे गट प्रकरणात भूमिका स्पष्ट करावी, असे कोर्टाने म्हटले आहे. सोबतच सुप्रीम कोर्टाकडून सर्व पक्षकारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून साॅलिसिटर जनरल यांनी नोटीस स्वीकारली आहे. तसेच उपाध्यक्षांनाही नोटीस बजावण्यात आली असून उपाध्यक्षांच्या वतीने धवन यांनी नोटीस स्वीकारली. दरम्यान सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी ११ जुलैला ठेवली आहे.
दरम्यान आजच्या सुनावणीत अनेक मुद्दे शिंदे गटाचे वकील तसेच सरकारचे वकील यांनी समोर ठेवले. तर कोर्टानेही काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत या बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी ५ दिवसांचा अवधी वाढवून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Narayan Rane : “युवराजांना अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अन…”; नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा बंडखोर नेत्यांना दणका, मंत्रीपदावरून केली हकलपट्टी
- Aaroh Welankar : “आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे…”, आरोहचे विधान चर्चेत
- Sanjay Raut ED Summons : “माझा शिरच्छेद केला तरी मी गुवाहाटीचा मार्ग…”, ईडी नोटीसीनंतर संजय राऊतांचे ट्वीट
- Sanjay Raut : बंडखोर आमदार मनसेच नाही, तर एमआयएममध्येही जाऊ शकतात; संजय राऊतांचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<