गुलाम नबी आझादांना काश्मीरचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी

blank

टीम महाराष्ट्र देशा : काश्मीरमधील सध्यस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयात आलेल्या विविध याचिकांवर आज सुनावनी झाली. सुनावणीदरम्यान गरज पडल्यास जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन आढावा घेणार असल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या याचिकेवर देखील सर्वोच्च्च न्यायालयाने आदेश दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुलाम नबी आझाद यांना जम्मू काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र तिथे जाऊन जनसभा किंवा सार्वजनिक भाषण करु नये अशी अट न्यायालयाने घातली आहे. आझाद यांना नगर, बारामुल्ला, अनंतनाग आणि जम्मू या जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास जम्मू-काश्मीरच्या परिस्थिती बाबत काश्मीर उच्च न्यायालयात जाणार आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.

दरम्यान कमल ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये दबाव तंत्र वापरत आहे. जम्मू काश्मीरच्या लोक दडपशाही खाली ठेवली जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या या दडपशाही विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आज एकत्रित सुनावणी झाली. राष्ट्रहितासाठी शाळा, रुग्णालये, परिवहन इत्यादी सेवा पूर्ववत करा, असे आदेश न्यायालयाने दिले.