आधार कार्ड लिंक करण्याची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली

aadhar karj mafi online adhaar

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड लिंक करण्याची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुढील सुनावणी होईपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले. यापूर्वी आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती.

आर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणे सरकारने बंधनकारक केले आहे. गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसंच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. बँका, मोबाइल नेटवर्किंग कंपन्या तसंच इतर अनेक ठिकाणांहून ग्राहकांना आधार लिंक करण्याचे अलर्टही यायला सुरूवात झाली आहे.Loading…
Loading...