fbpx

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करावी लागणार

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान व घोटाळे टाळण्यासाठी ईव्हीएम मशीनला नव्यानेच व्हीव्हीपॅट लावण्यात आले आहेत. आता या व्हीव्हीपॅट संदर्भात सर्वोच्च न्यायालयने मोठा निर्णय दिला आहे. मतमोजणी वेळी व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करावी लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास नियोजित कालावधी पेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शी कण्याच्या उद्देशाने मतमोजणी वेळी व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करणार आहेत. दरम्यान विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत ईव्हीएम (इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन) व व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) यांची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये किमान ५०% मशीन्सची तपासणी करण्यात यावी असा उल्लेख केला होता.

दरम्यान, देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार असून, २३ मे ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. परंतु व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करावी लागणार असल्याने लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास नियोजित कालावधी पेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची शक्यता आहे.