सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी ; मराठा समाजाने शांतता राखावी : गृहमंत्री

dilip valse patil

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट निर्णय दिलेला आहे. अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होत.

आज १०:४५ मिनिटांच्या सुमारास कोर्टाने त्यांचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे. गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षण रद्द करण्याच निकाल जाहीर होताच मराठा समाजामध्ये सध्या कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी समजणे आंदोलनाचा पवित्र हाती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

‘मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी व धक्कादायक आहे. राज्य सरकार तसेच संबंधित संघटनांनी अतिशय निर्धारपूर्वक हिरीरीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. तरीही अनपेक्षित निकाल हाती आला. राज्य सरकार सर्वसंबंधितांशी विचारविनिमय करून पुढील योग्य ती भूमिका ठरवेल.दरम्यान सर्वांनी कृपया शांतता राखावी’ असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या