fbpx

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय, १२ जुलैला पहिली तारीख

टीम महाराष्ट्र देशा : उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या सकारात्मक निर्णयानंतर या आरक्षणाला विरोधात असणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय दिला आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले आहे.इतकेच नव्हे तर राज्य सरकारला १०२ च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आयोग नुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले.

दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मराठा आरक्षण विरोधक अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेत आरक्षणाला विरोध केला होता. उच्च न्यायालयाने दिलेले मराठा आरक्षण घटनाबाह्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेविरोधी आहे. मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाच्या निकाल हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग करणारा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, असे ते त्यावेळी म्हणाले होते.