fbpx

श्रीसंत नावाचं वादळ पुन्हा मैदानात परतणार ? सुप्रीम कोर्टाने आजीवन बंदी उठवली

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा स्टार आणि भेदक फास्टर बॉलर एस श्रीसंतला मोठा दिलासा मिळाला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एस श्रीसंतवर ठेवण्यात आलेली आजीवन बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. तर बीसीसीआयला तीन महिन्यात शिक्षेवर पुनर्विचार करण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, आयपीएल 2013 मधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणात श्रीसंतसह अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासह स्पॉट फिक्सिंग प्रकरणात 36 आरोपींना जुलै 2015 मध्ये पटियाला हाऊस कोर्टाने दोषी ठरवलं होतं.

“बीसीसीयकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र श्रीशांतवर आजीवन बंदीवर पुनर्विचार करावा. श्रीशांतची बाजू ऐकून, त्याच्या शिक्षेबाबत तीन महिन्यात निर्णय घ्यावा. आजीवन बंदी खूपच आहे” अस कोर्टाने सांगितल आहे.