OBC Reservation | मुंबई : महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला परवानगी मिळण्यापूर्वी ज्या 365 ठिकाणी निवडणुकीची अधिसूचना जारी केली होती. तेथे आरक्षणाशिवाय निवडणुका होतील, असेही स्पष्ट केले आहे. त्या जागांसाठी नव्याने निवडणुकीची अधिसूचना जारी करता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने असे केले तर तो न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
विशेष म्हणजे 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या बांठिया आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन आठवड्यात अधिसूचित कराव्यात, असे निर्देश दिले. त्याचवेळी महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकार आणि विरोधी पक्ष या दोन्ही पक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते.
याआधी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण फेटाळले होते. या संदर्भात लोकसंख्येचे कोणतेही ठोस आकडे नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात ओबीसींची संख्या 38 टक्के आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्यासाठी माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली मागील महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने राज्याच्या मतदार यादीच्या आधारे प्रायोगिक आकडेवारी तयार केली होती आणि त्या आधारे सर्वोच्च न्यायालयातही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. ज्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde : “संजय राऊतांना सत्तांतराची स्वप्न रंगवू द्या, पण सरकार…”; एकनाथ शिंदेंचा टोला
- Eknath shinde vs Sanjay Raut | “त्यांना स्वप्न पाहू द्या”; एकनाथ शिंदेंचा राऊतांना टोला
- Sanjay Raut | महाराष्ट्राच्या राजकारणात ३ महिन्यापासून खेळ खंडोबा सुरू – संजय राऊत
- Amit Shah and Eknath Shinde : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार?
- Sanjay Raut | “महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल” ; संजय राऊतांचे मोठे विधान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<