पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सोलापूर मध्ये दडपशाही – प्रणिती शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थंडावलेल्या भाजप कार्यकर्त्यांना आणि नाराज असलेल्या जनतेला पुन्हा स्फूर्ती आणि विश्वासात आणण्यासाठी सोलापुर दौरा उद्या योजिलेला आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांच उद्घाटन करणार आहेत. पण कॉंग्रेस पक्ष मात्र या दौऱ्यात निषेध व्यक्त करणार असल्याच दिसून येत आहे. दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा पवित्रा काँग्रेसनं घेतला असून प्रशासनाने मात्र आंदोलनास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदींच्या दौऱ्याआधी सोलापूरमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Loading...

नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं दिली होती पण वास्तवात एक हि आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे जनता आक्रमक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं होणार असून आरक्षणाच्या प्रश्नावर अनेकजण रस्त्यावर उतरणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम असल्याने ते देखील सरकारचा निषेध करणार आहेत. याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाला मिळाल्यानं दडपशाही सुरू केली आहे.Loading…


Loading…

Loading...