मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल आठवलेंचा सत्कार

टीम महाराष्ट्र देशा : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मंगळवार दि. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे.यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांना स्टार महाराष्ट्र्र अवॉर्ड 2018 या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा मंगळवार दि 18 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता दादर शिवजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्य संयोजक श्रुती पाटील नामदेव मोहिते आणि हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.

स्टार महाराष्ट्र्र अवॉर्ड 2018 या पुरस्काराचे यंदाचे मानकरी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मानसी नाईक आणि दिग्दर्शक महेश कोठारे ; तसेच आमदार प्रवीण दरेकर; कालिदास कोळंबकर; तसेच समाजसेविका सौ सीमाताई आठवले ; पात्रकार किरण नाईक; अभिनेते संजय मोने; अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांसह अनेक मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच स्टार महाराष्ट्र्र जीवन गौरव अवॉर्ड या पुरस्कराने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुंबईचे माजी नगरपाल डॉ जगन्नाथ हेगडे;माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी; आमदार तामिळ सेलवन; वरिष्ठ पत्रकार मधू कांबळे ; नरेंद्र वाबळे; संजय भिडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मराठा समाजाचे कार्यकर्ते डॉ भूषण बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते पोपटशेठ घनवट, महेंद्र शिर्के, अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी च्या सौ प्रिया जाधव, शैलेश पोळ, सतीश परब, तसेच गीता कपूर, फारुख दळवी, अंकुश गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठमोळ्या घरंदाज लावण्यांचा कार्यक्रम गुलजार गुलछडी सादर करण्यात येणार आहे.