ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा- मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून ते आरक्षण नको. त्यासाठी सरकारने वेगळी उपाययोजना करावी. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केले आहे.

Rohan Deshmukh

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे सर्वच पक्षाचे मत आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय कसा घेतात त्यावर आमची पुढील दिशा ठरेल. सध्या त्यावर बोलण्यात अर्थ नाही असेही भुजबळ म्हणाले.

दरम्यान, “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. आरक्षण न्यायालयात टिकवणार, त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार आहे. आता मोर्चे आणि आंदोलन करण्यापेक्षा काय हवं आहे हे सांगायला पाहिजे”, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत सांगितलं.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...