लई भारी ! कलम 370 हटवण्याचा निर्णयाचे महाराजा हरी सिहांच्या पुत्राने केले समर्थन

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा म्हणजे कलम 370 हटवले आहे. या मोदी सरकारच्या या निर्णयाचे अनेक नेत्यांनी समर्थन केले आहे. तर आता खुद्द महाराजा हरी सिहां मुलाने म्हणजे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्णसिंह यांनी देखील मोदींनी कलम 370 बाबत घेतल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

याबाबत डॉ. कर्णसिंह म्हणाले की, ‘लडाखला केंद्रशासित बनवणे ही चांगलीबाब आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. मला चिंता केवळ जम्मू काश्मीरच्या कल्याणाची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. कलम 370 हा भारत आणि खासकरून जम्मू काश्मीरचा मोठा प्रश्न होता. मात्र पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी हा क्लिष्ट प्रश्न निकाली काढला आहे’. त्यामुळे अनेक पक्षांनी आणि काही कॉंग्रेस नेत्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतला होता. तसेच लोकसभेत आणि राज्यसभेत कडाडून विरोध केला होता. मात्र कॉंग्रेस मधील काही नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे कलम 370 वरून कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. खासकरून कॉंग्रेसच्या युवा नेत्यांनी कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता करणार शिवसेनेत प्रवेश

 

आधी अजितदादांच्या मांडीला मांडी, नंतर शिवस्वराज्य यात्रेचे काढले वाभाडे

 

भारताने या आधीचं पाकिस्तानशी सगळे संबंध तोडायला हवे होते : संजय राऊत