देशभरातून वाढतोय कन्हैय्याच्या उमेदवारीला पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या ज्वलंत भाषणांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरणारा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने या लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. या निवडणुकीत कन्हैय्या बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षा कडून निवडणूक लढवणार आहे. कन्हैय्याच्या विचारांनी तरुण वर्ग त्याच्या कडे आकर्षित होताना आपण पाहिलाच आहे. पण आता कन्हैय्याला सिने सृष्टीतून देखील पाठींबा मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी कन्हैय्याचे कौतुक करत त्याला मत देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.

शबाना आझमी यांनी ट्विट करत कन्हैय्याच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे. त्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, ‘कन्हैय्याकडे इच्छाशक्ती आहे, कन्हैय्याकडे विवेक आहे, कन्हैय्या सच्चा आहे. कन्हैय्या आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू ताकदीनं लढ ‘ असं म्हणत शबाना आझमी यांनी कन्हैय्या कुमारला निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान याआधी देखील अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी कन्हैय्याच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे.