स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्य सरकार घेणार ‘आधार’ची मदत

सोनोग्राफी टेस्ट करण्यासाठी यापुढे आधार कार्ड सत्कीचे होणार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आत राज्य सरकार आधार ची मदत घेण्याच्या तयारीत आहे. मागील काही काळात राज्यातील स्त्री भ्रूण हत्याचे प्रकरण वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार यापुढे सोनोग्राफी टेस्ट करण्यासाठी आता ‘आधार’ सक्ती करणार असल्याची शक्यात आहे.

महाराष्ट्रातील अनेक जोडपी गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येसाठी शेजारील राज्यांची वाट धरतात. अनेक महिला आपलं माहेर असल्याचं सांगत महाराष्ट्रातून शेजारी राज्यांमध्ये सोनोग्राफीसाठी येतात.

राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीत या विषयावर आधीच चर्चा करण्यात आली आहे. शेजारील राज्यांनाही यासंबंधी माहिती देण्यात येईल. प्रत्येक रुग्णाला ओळखपत्र सादर करणं अनिवार्य असेल. जे यूआयडीएआय कार्ड सादर करणं शक्य नाही, त्यांना मतदार ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असेल.

You might also like
Comments
Loading...