fbpx

अंधश्रद्धेची यात्रा: नवस फेडण्यासाठी भाविक पाठीला टोचतात लोखंडी गळ

shendra

टीम महाराष्ट्र देशा- शेँद्रा येथील मांगीरबाबा यात्रेस महाराष्ट्रातील लाखो भाविकांची दरवर्षी गर्दी होते. यात नवस फेडण्यासाठी भाविक पाठीला लोखंडी गळ टोचतात. याबाबत लालसेनेने गळटोचणी बंद करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यानंतर पोलिसांनी देवस्थान समितीला तशा प्रकारची नोटीस दिली. त्याला देवस्थान समितीने संमती दर्शवत देवस्थान समिती व ग्रामपंचायतने त्यादृष्टीने जनजागृती सुरु केली. व यासाठी प्रबोधनात्मक फलक ही लावण्यात आले. मात्र तरीही गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली.

भाविकासमोर देवस्थान समितीस व ग्रामपंचायतीस घ्यावे लागले नमते

गळ टोचणीला देवस्थान समिती, लालसेना व ग्रामपंचायत यांनी याला विरोध दर्शवला. मात्र भाविकांचा रेटा वाढतच गेला म्हणून मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाजाचा रोष पत्करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने समितीने गळ टोचणी होऊ दिली.

काय आहे गळ टोचणीची प्रथा
दीर्घ काळापासून मांगीरबाबा यात्रेस भाविकांची गर्दी असते. मारुती मंदिरासमोर नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या पाठीमध्ये लोखंडी गळ टोचतात. यानंतर जवळपास २०० फुटावरील मांगीरबाबाच्या मंदिरापर्यंत भाविक पळत जातात. या ठिकाणी गळ काढण्यात येतो. या आधी भाविक नवस फेडण्यासाठी जीभ व ओठातून गळ टोचत असत.