मुंबई : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची लेक ऐश्वर्या (Aishwarya) आणि अभिनेता धनुष (Dhanush) यांनी अलीकडेच त्यांच्या विभक्त (Separate) होण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघांचे १८ वर्षांचे लग्न मोडले आहे. मात्र, दोघांच्या विभक्त होण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आता बातम्या येत आहेत की, जेव्हा रजनीकांतला कळले की ते दोघेही त्यांचे नाते तोडणार आहेत, तेव्हा त्यांना दोघांना भेटून हे प्रकरण मिटवायचे होते. होय, रजनीकांत यांना दोघांना भेटून त्यांचे लग्न वाचवायचे होते.
दरम्यान ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांच्या सोशल मीडियावरील वेगळं होण्याच्या निणर्याच्या पोस्ट शेअर करण्यात आले. यानंतर चर्चांना उधाण आले. मात्र अभिनेता धनुष रजनीकांत यांच्या भेटीकडे दुर्लक्ष करत असे. रजनीकांतला भेटू नये म्हणून तो घरी गेला नाही कारण, त्याला त्याच्यासमोर राहून आणि त्यांच्याशी बोलण्यास नकार देऊन त्यांचा अनादर करायचा नव्हता. म्हणून त्यांना भेटण्यास टाळाटाळ केल्याचे आता चाहत्यांमध्ये चर्चा रंगत आहेत. तसेच धनुष आणि ऐश्वर्या कायदेशीररित्या वेगळे होत नसून दोन्ही मुलं मिळून वाढवणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.
धनुष पोस्टद्वारे काय म्हणाला
विभक्त होण्याची घोषणा करताना, धनुषने सोशल मीडियावर पोस्ट केली, ज्यामध्ये लिहिले होते, मित्र, जोडपे आणि पालक म्हणून १८ वर्षे एकत्र. या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. आज आपण त्या ठिकाणी आहोत जिथून आपले मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी एक जोडपे म्हणून वेगळे होत आहोत.
ऐश्वर्यानेही हीच पोस्ट शेअर केली होती, मात्र त्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, कॅप्शनची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या प्रेमाची आणि समजुतीची गरज आहे. धनुषने १८ नोव्हेंबर २००४ रोजी ऐश्वर्यासोबत लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना दोन मुले आहेत, एक मुलगा यात्रा ज्याचा जन्म२००६ मध्ये झाला आणि मुलगी लिंगाचा जन्म २०१० मध्ये झाला.
OM NAMASHIVAAYA 🙏🙏🙏 pic.twitter.com/XXFo8BDRIO
— Dhanush (@dhanushkraja) March 23, 2021
ऐश्वर्या एक गायिका आणि दिग्दर्शक आहे. ऐश्वर्याने तमिळ इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शिका म्हणून करिअरची सुरुवात ‘3’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात धनुषने अभिनेता म्हणून काम केले आहे. एवढेच नाही तर या चित्रपटातील ‘कोलावरी डी’ हे गाणे खूप व्हायरल झाले आहे. या गाण्याने धनुषलाही बरीच प्रसिद्धी मिळाली. मात्र सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांसह सर्वांनाच त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता लागली.
महत्वाच्या बातम्या: