सुपरस्टार रजनीकांतचा एकत्र निवडणुक घेण्यास पाठींबा

rajnikant-launches-new-website

टीम महाराष्ट्र देशा : एकत्र निवडणूक झाल्यास पैसा आणि वेळ वाचण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करत सुपरस्टार रजनीकांतने एकत्र निवडणुक लढवण्याच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे रजनीकांतही भाजप नेत्यांच्या सुरात-सूर मिळवत असल्याच दिसत आहे.

देशभरात एकत्र निवडणुका घेतल्यास शासन व्यवस्थेवर होणारा परिणाम, तसेच निवडणुकीच्या निमित्ताने आचार संहिता लागू होण्याने विकासाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होत असल्याच मत भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यासर्व गोष्ठी आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली केंद्रातील मोदी सरकारकडून सुरु असल्याच सांगितल जात आहे.

निवडणूक आयोगही तयार

ऑक्टोंबर २०१७ मध्ये भोपाळ मधील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यास आम्ही सज्ज आहोत. अशी माहिती केंद्र सरकारला निवडणूक आयोगाने दिली होती. एकत्र निवडणुका घ्यायच्या असल्यास ४० लाख इव्हीएमची गरज असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

जाणून घ्या नवनिर्वाचित चार खासदारांची कारकीर्द 

पराभवाच्या भीतीनेच सर्वत्र विरोधक एकत्र येत आहेत- चंद्रकांत पाटील