सुपरहिट अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले ५६ व्या वयात पदार्पण

सचिन खेडेकर

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिने सृष्टीमध्ये भक्कम स्थान निर्माण केल आहे. अनेक मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे. तसेच सचिन खेडेकर यांनी सुपरहिट नाटकं आणि चित्रपटांध्ये काम केलं आहे. रोमँटिक हिरो, वडील, भाऊ आणि चित्रपटातील खलनायक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज सचिन खेडेकर यांचा ५६ वा वाढदिवस आहे.

सचिन खेडकर यांनी ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या सुपरहिट चित्रपटातील निभावलेले भूमिका लोकांच्या मनाला भावणारी ठरली. कच्चा लिंबू, नागरिक, नेताजी सुभाषचंद्र बोस, या चित्रपटामध्ये देखील त्यांनी उत्तम भूमिका साकारली आहे. तसेच हिंदी सिनेसृष्टीतील ‘सिंघम’ मध्ये साकारलेली त्यांची भूमिका लोकप्रिय झाली होती.

तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर चित्रपटातत अभिनेता सचिन खेडेकर यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. छोट्या पडदयावरील ‘कोण होणार करोडपती’ या सोनी मराठीवरील रिअॅलिटी शो मध्ये देखील त्यांनी सूत्र संचलनाचे कार्य केले आहे. या कार्यक्रमाद्वारे ते स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यास मदत करत असत.

महत्वाच्या बातम्या

IMP