सुपर स्प्रेडर…आता व्यापाऱ्यांसह हॉटेल चालकांचेही लसीकरण

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच पेक्षा कमी आल्याने ७ जूनपासून शहरात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र येत्या काळात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने कोरोना प्रसारात मुख्य भूमिका असलेल्या व्यापार्‍यांसह हॉटेल चालक व कोरोना स्प्रेडर असलेल्या नागरिकांचे पुढच्या आठवड्यापासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनलॉकच्या नियमावलीतील पाच टप्प्यांतील पहिल्या टप्प्यात औरंगाबादचा समावेश झाल्याने आता सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. मात्र कायम पहिल्या टप्प्यात राहण्यासाठी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट पाचपेक्षा कमी ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने कोरोना स्प्रेडर वर्गाचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरातील निर्बंध शिथील झाल्यामुळे सर्व व्यवहार सोमवार (दि. ७) पासून सुरळीत सुरू झाले आहेत.

पॉझिटिव्हीटीच्या पहिल्या लेव्हलमध्ये राहण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर करावा आणि सोशल डिस्टंसिगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे कोरोना संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे सुपर स्पेडर असलेली ठिकाणे आणि व्यक्ती यांच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

त्यासाठी शहरातील व्यापारी व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, हॉटेल चालक व कर्मचारी यांचे लसीकरण करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपमध्ये स्वतंत्र साईट सुरू करून त्यामध्ये नोंदणी केली जाणार आहे. व्यापारी व हॉटेल चालकांची पुढच्या आठवडयात लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात व्यापार्‍यांच्या नियमित आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाणार आहेत.

व्यापार्‍यांना दर पंधरा दिवसांनी चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे व्यापार्‍यांच्या चाचण्यांसाठी चार केंद्र सुरु केले आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी चाचण्या केल्या जातील. बायजीपुरा आरोग्य केंद्र, औरंगपुरा आरोग्य केंद्र, सिडको एन-5 येथील संत तुकाराम नाटयगृह, एमआयटी कॉलेज इमारत क्रमांक 2 या केंद्रांवर व्यापार्‍यांची चाचणी केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

IMP