कंगणा-उर्मिलाच्या वाकयूद्धात आता सनी लियोनीची एन्ट्री, कंगणाला लगावला टोला

SUNNY LEONE

मुंबई : अभिनेत्री कंगणा रनौत आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात रंगलेल्या वाकयूद्धात आता अभिनेत्री सनी लियोनीने उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी कंगणाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना सॉफ्ट पॉर्न स्टार असं म्हटलं होतं. आता यावरून वादंग तापलेलं असताना पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार आणि आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने आपल्या ईंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करताना ‘तुमच्याबद्दल कमीत कमी माहिती असलेले लोकच तुमच्याबद्दल जास्तीत जास्त सांगत असतात’ हे मजेशीर आहे असं सांगत सनी लियोनीने अभिनेत्री कंगणा रनौतला टोला लगावला आहे. यावरून आता कंगणा विरुद्ध सनी लियोनी असाही वाद आता आपल्याला पहायला मिळू शकतो.

जेव्हा अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी कंगणा रनौतला खडसावल्यानंतर कंगणाने उर्मिला मातोंडकरांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. आता महाराष्ट्रातून आणि देशातून उर्मिला मातोंडकरांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून पाठिंबा मिळत असून आता यावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने संपूर्ण बॉलिवूडला ड्रग अडिक्ट म्हटल्यानंतर उर्मिला मातोंडकरने तिला चांगलंच फटकारलं होतं. यानंतर कंगनाने तिला एका वृत्त वाहिनीवर ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं. सिनेसृष्टीतील बर्याच लोकांनी कंगनाच्या या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली होती. आता सिनेनिर्माते राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलाचं समर्थन केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून उर्मिलाचं कौतुक केलं आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करत म्हटलं की, मी कोणाबद्दलही चुकीचा शब्द वापरणार नाही. मला विश्वास आहे की उर्मिला मातोंडकर हिने रंगीला, सत्य, कौन, भूत, एक हसीना थी यांसारख्या सिनेमांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. तसेच अनेक कठीण भूमिकांमधून तिने आपलं हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व सिद्ध केलं आहे.

उर्मिलाने मुलाखतीत काय म्हटलं

मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर म्हणाली की, जिथे कंगना राहते तो हिमाचल प्रदेश हा तर अमली पदार्थांचा गड आहे. हे तिला माहीत नाही का? त्याचवेळी जया बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडची प्रतिमा डागळ्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :