fbpx

Sunny Leone- सनी लिओनी झाली आई

वेबटीम : बेबी डॉल सनी लियोनी आणि तिचा पती डेनिअल वेबर या दोघांनी अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.या बहुचर्चित दाम्पत्याने मुलगी दत्तक घेतली आहे.लातूरमधील 21 महिन्यांची गोंडस मुलीचे सनी लियोनी डेनिअल हे आई-बाबा झाले आहेत.सनीने मुलीचे नामकरणही केले आहे.तिचे नाव निशा कौर वेबर असे ठेवले आहे.बहुतांश पालक मुलगा दत्तक घेतात.पण आम्ही मुलगी दत्तक घेतली आहे.निशा हिला आम्ही नाही तर तिनेच आम्हाला पालक म्हणून निवडले असल्याचे सनीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
सनी म्हणाली प्रेग्नंसीची भीती वाटते…
‘फॅमिलीबाबत तुझे काय प्लॅन आहेत?’या प्रश्नावर उत्तर देताना सनी लियोनी हिने सांगितले की,आई होण्याची तिची मनापासून इच्छा होती.मात्र,प्रेग्नंसीची प्रचंड भीती वाटते,म्हणून तिने निशाला दत्तक घेतले आहे.

2 Comments

Click here to post a comment