विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी सोडणार नाहीत, सुनील तटकरेंना विश्वास

सुनील तटकरे

टीम महाराष्ट्र देशा: माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता वानखेडे स्टेडियमवरच्या गरवारे क्लब मध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती खुद्द रणजीतसिंह यांनी दिली.आहे, विशेष म्हणजे रणजीतने केलेल्या घोषणेला माझी सहमती आहे, असं खा विजयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. नेते हे कार्यकर्त्यांची नाराजी दूर करत असतात, त्याप्रमाणे मोहिते पाटील हे देखील रणजितसिंह आणि त्यांच्या समर्थकांना समजावतील. त्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार नाहीत, असा विश्वास माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहे. याबाबत तटकरे यांना विचारल असता, आपण त्यांच्यावर अन्याय होत आहे का हे आपल्याला माहित नसल्याचं ते म्हणाले.

रणजितसिंह यांचा आज भाजप प्रवेश
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रावादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर मोहिते पाटील पित्रा – पुत्रा पैकी एकाला उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. परंतु पक्षाने अद्याप माढ्यासाठी उमेदवार घोषित केलेला नाही. त्यामुळे सोलापूरमधील मोहिते पाटील समर्थकांत नाराजीचे वातावरण आहे. तसेच मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आपले राजकीय भवितव्य वाचवण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.