fbpx

नाराजी मावळली ! तटकरेंना रायगड सर करणं झालं सोपं

sunil tatkare

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय पक्षांची आणि नेत्यांची समीकरणे बदलल्याचे आपण पाहिली आहे. अनेक नेत्यांनी एकमेकांवर ताशेरे ओढले आहेत. मात्र लोकसभेचा बिगुल वाजताच हे सर्व लोक पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती रायगडमध्ये देखील पाहायला मिळत आहे. अलिबागचे आमदार मधुकर ठाकूर, आमदार माणिकराव जगताप, भास्कराव जाधव या तिन्ही नेत्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मनधरणी केली आहे.

याआधी एकमेकांची तोंड न पाहणारे नेते आता लोकसभेच्या प्रचारासाठी हातात हात घेऊन एकत्र प्रचार करताना दिसणार आहेत. यामुळे सुनील तटकरे यांना रायगड सर करण्यास जास्त कसरत करावी लागणार नाही. अशी चिन्ह आता रायगडमध्ये दिसत आहेत. रायगड मधील अशी अचानक राजकीय गणित बदलल्याचे पाहून रायगड लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.