कॅबिनेटमंत्री सभागृहात हजर रहात नसल्याने संसदीय कामकाजमंत्र्यांनी माफी मागावी – सुनिल तटकरे

मुंबई –  अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कॅबिनेटमंत्री रोजच हजर रहात नसल्याने सभागृह तहकुब करावे लागते आहे. याचा अर्थ अधिवेशनामध्ये सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर नाही त्यामुळे संसदीय कामकाजमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी आमदार सुनिल तटकरे यांनी विधानपरिषदेत करत सरकारच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.

सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडवले जातात परंतु जनतेचे प्रश्न मांडले जात असताना त्याचे उत्तर देण्यासाठी कॅबिनेटमंत्री सभागृहामध्ये हजर नसतात यावर आमदार सुनिल तटकरे आक्रमक झाले. त्यांनी सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर दिसत नाही. जवळपास रोजच सभागृहात कॅबिनेट मंत्री नसल्याने सभागृह तहकूब करण्याची नामुष्की ओढवलेली आहे. संसदीय कामकाज कमी कसे होईल ? असा सरकारचा कल दिसतो असा आरोपही आमदार सुनिल तटकरे यांनी केला

You might also like
Comments
Loading...