सातबारा कोरा होईपर्यंत सरकारवर हल्लाबोल -सुनिल तटकरे

sunil tatkare angry

पुणे दि . 12 – राज्यातील माझ्या शेतकर्यांचा सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल सुरुच राहणार आहे असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दौंडच्या जाहीर सभेत सरकारला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोलची ही अकराव्या दिवसातील ही 32 वी जाहीर सभा दौंड -वरवंड येथे पार पडली.

सरकारच्या विरोधात जनतेमध्ये चीड, संताप आणि रोष निर्माण झाला आहे. हा रोष, ही चीड, संताप राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एकवटत आहे. या सरकारने साडेतीन वर्षात जनतेला अनेक आश्वासने दिली. त्यामध्ये मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले परंतु  यापैकी काही दिले नाही.

धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हटले परंतु  200 ते 300 कॅबिनेट झाल्या मात्र आरक्षण दिले नाही. मुस्लिमांविषयी द्वेष असलेल्या जात्यांध सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही असा आरोप सुनिल तटकरे यांनी केला.