fbpx

निनावी पत्राद्वारे सुनील तटकरेंना जीवे मारण्याची धमकी

sunil tatkare

टीम महाराष्ट्र देशा: रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळी या गावातील सातपुते बाळासाहेब भाऊसाहेब ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची आहे पूर्ववैमन्यसातून काही साथीदारांच्या मदतीने सुनील तटकरेंना ठार मारण्याचा त्याचा प्लान असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. धमकी देणाऱ्याच्या घराच्या पत्त्यासह माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे.

सुनील तटकरे हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असल्याने या पत्राकडे गांभीर्याने पहिले जात आहे. या प्रकरणाची तक्रार म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.सुनील तटकरेंना आलेल्या धमकीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची एक टीम तयार करून उल्लेख केलेल्या पत्त्यावर पाठवण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.