हा तर निव्वळ खोडसाळपणा, शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

blank

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या हा निव्वळ खोडसाळपणा आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेससोडून इतर कोणत्याही पक्षात आपण जाणार नाही. अशा बातम्यांना तातडीने आळा बसायला हवा, अशी संतप्त प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे खा. सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचं बोलल जात आहे. सुनील तटकरे यांनी मात्र सर्व वृत्तांच खंडन केले आहे. समीर भुजबळ यांनी देखील भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगिलते आहे.

योग्य वेळी सर्व गोष्ठी कळतील, भुजबळांच्या प्रवेशावर उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य

शिवसेना पक्षप्रमुख उध्वव ठाकरे यांना भुजबळ – तटकरेंच्या प्रवेशबद्दल विचारल असता योग्य वेळी सर्व गोष्ठी कळतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. कॉंग्रेसच्या निमर्ला गावित आणि राष्ट्रवादी काँगेसच्या रश्मी बागल यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला, गावित आणि बागल यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधले आहे. यावेळी बोलताना चांगले लोक पक्षात येत आहेत, त्यामुळे पक्षाची ताकद वाढत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या