fbpx

Video- अच्छे दिनाच्या नावाने फसवणूक- तटकरे

औरंगाबाद – अच्छे दिनाच्या नावाने फसवणूक, कर्जमाफी, रोजगार, बोंडअळीची मदत, स्मारक, आरक्षणाच्या नावानेही या सरकारने फसवणूक केली. अधिकारी, डॉक्टर ते एसटी कामगारापर्यंत सर्वच संपावर गेले. आता या फसव्या सरकारला संपावर पाठवायची वेळ आली आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रेची सांगता सभा सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी देखील या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

सुनील तटकरेंचा सरकारवर ‘हल्लाबोल’

पवार साहेबांनी कृषीमंत्री असताना कर्जमाफीच्या स्वरुपात देशभरातील शेतकऱ्यांना न्याय दिला होता. मात्र भाजप सरकारची धोरणे शेतकऱ्यांच्या विरोधात असून व्यापारांना लाभ मिळेल अशी आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित अशा महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेची फसवणूक भाजप सरकारने केली म्हणूनच या खोटारड्या सरकारच्या विरोधात आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा हल्लाबोल राष्ट्रवादीने केला आहे. अच्छे दिनाच्या नावाने फसवणूक, कर्जमाफी, रोजगार, बोंडअळीची मदत, स्मारक, आरक्षणाच्या नावानेही या सरकारने फसवणूक केली. अधिकारी, डॉक्टर ते एसटी कामगारापर्यंत सर्वच संपावर गेले. आता या फसव्या सरकारला संपावर पाठवायची वेळ आली आहे .